मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे पिंपरीत दहन करण्यात आले.
जळगाव येथील जाहीर सभेत बोलताना ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध दर्शविला होता, असे सांगत संभाजी  ब्रिगेडने ठाकरे यांचा जाहीर निषेध केला असून संघटनेचे शहराध्यक्ष अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cremation of raj thackerays statue in pimpri by sambhaji brigade
Show comments