देशात करोनामुळे झालेली बिकट स्थिती पाहता वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी मदतीचा हात पुढे केला आहे. करोना स्थिती हाताळण्यासाठी जी जी मदत लागेल ती केली जात आहे. भारतीय क्रिकेट संघात कर्तृत्व गाजवण्याऱ्या अजिंक्य रहाणे यानेही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर (एमसीसीआयए) प्रणित पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर) या समूहाला क्रिकेटपटू अंजिक्य रहाणे याने ३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. पीपीसीआरकडून ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी मिशन वायू ही मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांतील रुग्णालयांना आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर देण्यात येणार आहेत. या मोहिमेला क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची मोलाची साथ लाभली आहे. याबाबतची माहिती एमसीसीआयएनं ट्विटरद्वारे दिली आहे.

रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे अजिंक्य रहाणेनं केलेल्या मदतीमुळे रुग्णांचे जीव वाचण्यास मदत होणार आहे.

पुणे : “साहेब, आमचा नंबर घ्या ना प्लिज…”; लसीकरण केंद्रावर पोलिसांना करावं लागलं पाचारण

अजिंक्य रहाणे सध्या आयपीएलमध्ये दिल्ली संघाकडून खेळत आहे. दिल्ली संघाने आतापर्यंत ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. अजिंक्यला चेन्नई आणि राजस्थान विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली होती.

Story img Loader