पिंपरी : प्रशिक्षकाने त्याच्याकडे सरावासाठी असलेल्या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे शासनाला सादर केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी प्रशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या कालावधीत प्रभात रोड, एरंडवणे, पुणे येथे घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गणेश पोपट पाटील (वय ४५, रा. एरंडवणे, पुणे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशुतोष मुरलीधर जगताप (रा. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ९० हजार ६११ मतदार

जगताप याने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविण्यासाठी त्यांच्याकडे सरावासाठी असलेल्या खेळाडू यांचे प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक होते. त्याकरिता  जगताप याने पाटील यांच्या मुलाच्या नावाचा शंभर रुपये दराचा स्टॅम्प पेपर घेऊन त्यावर बनावट प्रमाणपत्र तयार केले. ती कागदपत्रे शासनाला सादर करून फिर्यादी आणि शासनाची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.