लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: प्रभागात केलेल्या कामाची तक्रार केल्याच्या रागातून एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका माजी नगरसेवकावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एकाने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार माजी नगरसेवक गणेश बाळासाहेब ढोरे (वय ३५, रा. फुरसुंगी रस्ता, भेकराईनगर) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सागर पोट्रे (वय २६, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी) आणि प्रणव ढमाले (वय २६, रा. भेकराईनगर) यांच्या विरोधात मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पुणे : धक्कादायक.. शुक्रवार पेठेत पती-पत्नी आढळले मृतावस्थेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोरे फुरसुंगी भागातीलमाजी नगरसेवक आहेत. ढोरे यांनी प्रभागात केलेल्या कामांबाबत एका पत्रकाराने तक्रार केली होती. त्यामुळे ढोरे यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तक्रारदाराने पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्याचा राग मनात धरून आरोपी ढोरे यांनी पोट्रे आणि ढमाले यांना सांगून तक्रारदारांना मारहाण केली. दोघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against former corporator in caste abuse case pune print news rbk 25 mrj