लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केल्याप्रकरणी कालिचरण महाराज यांच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Worli accident case, Mihir Shah , High Court ,
वरळी अपघात : मिहीर शहावर खुनाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवण्याची मागणी, उच्च न्यायालयाने घेतली दखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Jaideep Apte , bail , High Court,
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
mastermind , construction businessman murder ,
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत, दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण
Baba Siddiqui murder, dominance, Mumbai Police Crime Branch, charge sheet,
वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सिद्दिकींची हत्या, ४५९० पानांच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा दावा

याबाबत पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कालिचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग (वय ४८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिंहगड रस्ता भागातीाल सनसिटी रस्ता परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कालिचरण महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कालिचरण महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केले होते.

आणखी वाचा-पुणे अन् पिंपरी-चिंचवडकरांसाठी सुटीचा दिवस ठरतोय ‘मेट्रोवार’

कालिचरण महाराजांनी केलेल्या भाषणाची ध्वनिचित्रफीत पोलिसंनी कायदेशीर बाबी विचारात घेऊन पडताळून पाहिली. त्यानंतर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी कालिचरण महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक कादबाने तपास करत आहेत.

धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी कालिचरण महाराजांविरुद्ध यापूर्वी पुण्यासह राज्यभरात गुन्हे दाखल झाले आहेत.

Story img Loader