पुणे : शिकवणीसाठी आलेल्य शाळकरी मुलीशी अल्पवयीनाने अश्लील कृत्य केल्याची घटना घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याबाबत मुलीच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची आठ वर्षाची मुलगी येरवडा भागात एका महिलेकडे खासगी शिकवणीसाठी जायची. शिक्षिकेचा १४ वर्षीय चुलतभाऊ तेथे राहायला आहे. आठवड्यापूर्वी शिक्षिका घरी नव्हती. तेव्हा मुलाने मुलीला गच्चीवर नेऊन तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलगी दोन दिवसांपूर्वी शिकवणीसाठी घरी आली. तेव्हाही शिक्षिका घरी नव्हती. त्यावेळी मुलाने मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. चौकशीत शिक्षिकेच्या १४ वर्षीय चुलतभावाने मुलीबरोबर दोनदा अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली.

१४ वर्षीय मुलाविरुद्ध पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका देवकर तपास करत आहेत.