लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : लोहगाव परिसरातील केंद्रीय विद्यालय या ठिकाणी शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक म्हणून काम करत असलेल्या एकाने शाळेतील दहा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींचा शरीरास आक्षेपार्ह स्पर्श करून त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षक संजय देशमुख (रा. लोहगाव, पुणे ) याच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा-पुणे रेल्वे स्थानकावर आता ‘एआय’ची नजर! हावभावावरून टिपणार संशयास्पद हालचाली

याबाबत पीडित मुलीच्या ४२ वर्षीय आईने शिक्षकाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार १ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय देशमुख हा केंद्रीय विद्यालयात शारीरिक शिक्षण विषयाचा शिक्षक आहे. तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी शाळेमध्ये असताना, दोन आठवड्यापूर्वी आरोपीने क्रीडा तासाच्यावेळी मैदानावर त्याच्या एल्बोने तिच्या पोटाला आणि पाठीला वाईट उद्देशाने हात फिरवला. तसेच तिच्या मैत्रिणीच्या शरीराला वाईट उद्देशाने हाताने स्पर्श करून तिचा विनयभंग करून वाईट उद्देशाने ‘तुला पीटी क्लास कसा वाटला’ अशी विचारणा करून अश्लील कृत्य केल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी पुढील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime against teacher who molested female students pune print news vvk 10 mrj
Show comments