रीक्षाचालकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण प्रकाश पल्लेलू (वय ३२, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्या रीक्षाचालकाचे नाव आहे. रीक्षाचालक पल्लेलू याच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तुषार कांबळे, शुभम शिंदे, प्रवीण ननावरे (तिघे रा. कोंढवा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रीक्षाचालक पल्लेलू आणि त्यांचा मित्र रीक्षातून कोंढवा परिसरातून जात होते. त्या वेळी आरोपी कांबळे, शिंदे, ननावरे यांनी रिक्षा अडवली.

हेही वाचा >>> पुणे : दोन वर्षांनंतर वाजत-गाजत होणार गणरायाचे आगमन; मानाच्या गणपतींची मुहूर्तावर होणार विधिवत प्राणप्रतिष्ठापना 

रीक्षातून कोंढवा परिसरात सोडण्यास सांगितले. पल्लेलू यांनी तिघांना सोडण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी पल्लेलू यांना बेदम मारहाण केली. आरोपी कांबळेने पल्लेलू यांच्यावर कोयत्याने वार केले. पसार झालेल्या आरोपींची शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

Story img Loader