लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: हॉटेल व्यावसायिकाला मैत्रीच्या जाळ्यात ओढून एक लाख ८० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या महिलेविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बाबत एका हॉटेल व्यावसायिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल
Rape on Minor Girl and then Accused Killed Her
Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या, मृतदेह बापगाव भागात फेकला; आरोपी विशाल गवळीला अटक

आरोपी महिला हॉटेल व्यावसायिकाच्या मित्राची पत्नी आहे. आर्थिक व्यवहारांमुळे दोघांमध्ये मैत्रीसंबंध निर्माण झाले. त्यानंतर महिलेने हॉटेल व्यावसायिकाच्या प्रेमपाशात ओढण्याचा प्रयत्न केला. हॉटेल व्यावसायिकाने तिला प्रतिसाद दिला नाही. महिलेने त्याला शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकावले. मात्र, त्याने नकार दिला. त्यानंतर हॉटेल व्यावसायिकाकडे तिने दोन लाख रुपयांची मागणी केली.

आणखी वाचा-पुणे : जोरदार पावसात मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करून नातेवाईकांत बदनामी करण्याची धमकी तिने हॉटेल व्यावसायिकाला दिली. घाबरलेल्या हॉटेल व्यावसायिकाने तिला एक लाख २० हजार रुपये दिले. त्यानंतर हे प्रकरण मिटवावे लागेल, असे सांगून तिने त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. हॉटेल व्यावसायिकाने तिला ६० हजार रुपये दिले. हॉटेल व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना तिने धमकावून शिवीगाळ केल्याचे हॉटेल व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर आरोपी महिला हॉटेल व्यावसायिकाला धमकावत होती. तिच्या धमकीमुळे घाबरलेल्या हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करत आहेत.

Story img Loader