लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : काकूला धमकावून तरुणाने बलात्कार करुन तिच्याकडून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुतण्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत एका ३७ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यभागात तक्रारदार महिला राहायला आहेत. मध्यभागात त्यांचे दुमजली घर आहे. चार वर्षांपूर्वी त्याने काकूला पहिल्या मजल्यावर बोलाविले. तू माझ्याशी लगट करायचा प्रयत्न करते. हा प्रकार काकाला सांगेल, अशी धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला.

आणखी वाचा-“सुनील कावळेंच्या आत्महत्येला पूर्णपणे सरकार जबाबदार, आता…”; मनोज जरांगे आक्रमक

त्यानंतर आरोपी तरुण काकूला धमकावत राहिला. त्याने काकूकडून वेळोवेळी पैसे उकळले. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या काकूने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मुळीक तपास करत आहेत.