इंडियन प्रीमियर लिगच्या (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू या सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एका बुकीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ताब्यात घेतले. येरवडा भागात ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आकाश धरमपाल गोयल (३०, रा. लोहगाव) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा >>> पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन तयार

आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू या सामन्यावर गोयल हा सट्टा घेत असल्याची माहिती युनिट तीनच्या पथकाला मिळाली होती. त्यानूसार पथकाने सापळा रचून गोयल याला येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने ३१ मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहीरट, अंमलदार संतोष क्षीरसागर, शरद वाकसे, सुजीत पवार, संजिव कळंबे, सोनम नेवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader