पिंपरी : भांडण झाल्याने घर सोडल्यानंतर दुचाकी कशी चालू करायची, हॅन्डल लॉक कसे तोडायचे हे यूट्यूबवररुन पाहून महामार्गालगतच्या दुचाकी चोरणा-याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून आठ लाख ९० हजार रुपयांच्या १८ दुचाकी जप्त केल्या. तर, वाहनचोरीचे १६ गुन्हे उघडकीस आले आहेत.

अभिषेक मल्लाप्पा हावळेकर (वय २१, रा. आंबेठाण, चाकण, मूळ शाहुपुरी, सातारा) असे अटक केलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाणेर-म्हाळुंगे येथील एका गृहनिर्माण सोसायटीतील एक बुलेट आणि दुचाकी चोरीला गेली होती. त्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील ८० सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी केली. त्यानुसार त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले.  अभिषेक याच्यासह दुचाकी चोरल्याची कबुली अल्पवयीन साथीदाराने दिली. 

Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
murder on suspicion of mobile phone theft, suspicion of mobile phone theft,
भिवंडीत मोबाईल चोरीच्या संशयावरुन एकाची हत्या, शांतीनगर पोलिसांनी केली सातजणांना अटक
Delhi: Elderly Man Robbed At Knife Point By Bike-Borne Thieves On Pretext Of Asking Directions In Vivek Vihar
चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; वृद्ध व्यक्तीबरोबर भर दिवसा काय घडलं पाहा; VIDEO पाहून गोंधळून जाल
Viral Video Shows Traffic Police has stopped a Baby Girl
VIRAL VIDEO : लायसन्स कुठे आहे? आजोबा-नातीला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं, दंड मागताच पाहा चिमुकलीने काय केलं
Terrorism started by gangs in Pune crime news Pune news
निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्याकडून दहशतीचे प्रकार – वारजे, पर्वती, चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Bengaluru building collapse
Building Collapses: पत्त्यासारखी कोसळली इमारत; ५ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, थरारक व्हिडीओ व्हायरल
36 mobile phones stolen at British singer Alan Walker live concert
ब्रिटीश गायक ॲलन वॉकर रजनीत चोरट्यांचा धुमाकूळ, ३६ मोबाइल चोरी; चौघे गजाआड

हेही वाचा >>>पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करून पसार झालेले सराइत गजाआड, सोलापूर परिसरात गुन्हे शाखेची कारवाई

अभिषेक घरी भांडण झाले म्हणून पुण्याला आला होता. त्याने  यूट्यूबवररुन दुचाकी कशी चालू करायची,  हॅन्डल लॉक कसे तोडायचे हे पाहिले होते. ते पाहून दुचाकींची चोरी करत होता. ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यांमध्ये दिसू नये यासाठी तो महामार्गालगतच्या दुचाकींची चोरी करत होता. पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा येथून दुचाकी चोरल्याचे कबुली त्याने दिली.