पुणे : स्वारगेट परिसरात कालव्याजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. स्वारगेट परिसरातील कालव्याजवळ एका पत्र्याच्या खोलीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी जुगार खेळण्यासाठी आलेले दहा जणांना पकडले. त्यांच्याकडून १५ हजार ४९० रुपये जप्त करण्यात आले.

हेही वाचा <<< कर्ज प्रकरणातील तगाद्यामुळे जामीनदाराची आत्महत्या; पोलिसांसह तिघांवर गुन्हा

हेही वाचा <<< पुणे : गुरुवारी संपूर्ण दिवस काही भागाचा पाणीपुरवठा बंद

जुगार खेळणाऱ्यांसह जुगार अड्डा चालविणाऱ्याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक श्रीधर खडके, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader