पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट दोन ने मोबाईल आणि सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला जेरबंद केल आहे. त्यांच्याकडून चार कोयते, चार दुचाकी, एक तलवार, सात मोबाईल, सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी मोहम्मद मुस्ताक सिद्दिकी, पांडुरंग बालाजी कांबळे, तुषार उर्फ बाळ्या अशोक माने आणि अर्जुन संभाजी कदम यांना अटक केली असून त्यांच्या इतर चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी, भोसरी, चिखली परिसरामध्ये दुचाकी अडवून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला अखेर जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट दोन ला यश आले आहे. आरोपी दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत असल्याचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे.
हेही वाचा… पवना नदीच्या पाण्यावर फेसाळ थर
अखेर याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोन ने आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी सोन्याचे दागिने विकणारा आणि विकत घेणाऱ्या व्यक्तीला देखील आरोपी करण्यात आले आहे. मनोज सोलंकी आणि मुराद दस्तगीर मुलानी यांना ताब्यात घेतला आहे अशी माहिती गुन्हे शाखा युनिट दोन ने दिली आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या टीम ने केली आहे.