शिरूर : कॅफे मध्ये अश्लील वर्तन करण्यास मुभा देणाऱ्या शहरातील रेव्हन्यू कॉलनीतील ‘द स्टीम रुम कॅफे’  चालकावर पोलीसांनी कारवाई करत ऋषीकेश रामदास ढवळे वय २३ वर्ष रा. ढवळगाव ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर याचे विरूद गुन्हा दाखल केला आहे .

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना शिरूर शहरातील वेगवेगळ्या कॅफे चालकानी  त्याचे कॅफे हॉटेल मध्ये अवैध पार्टीशन केल्याने शाळेतील व कॉलेज मधील मुले मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक संदेश केजळे यांना मिळाली  होती.

त्यानुसार  महिला पोलीस हवालदार जाधव पो.कॉ. शिंदे, पो.कॉ थोरात पो.कॉ आव्हाड यांनी साध्या वेषात शहरातील रेव्हेन्तू  कॉलनी येथील द स्टीम रुम कॅफे येथे जावुन नाष्टा ऑर्डर देवुन तेथे ते बसले असता त्यांना काही मुले व मुली येवुन कॅफे चालकाने पार्टीशन केलेल्या रूमध्ये बसुन असभ्य व अश्लील कृत्य करताना मिळुन आले तसेच आणखी काही शाळकरी मुले व मुली देखील तेथे येत असल्याचे दिसुन आले.

याबाबत शिरूर पोलीस स्टेशचे पो.कॉ रविंद्र बापुराव आव्हाड यांनी स्टेशन य कॅफे चालक ऋषीकेश रामदास ढवळे (वय -२३ ) वर्ष रा. ढवळगाव, ता.श्रीगोंदा जि. अहील्यानगर याचे विरुध्द शाळकरी मुला मुलीना अश्लील वर्तन करण्यास मुभा दिल्याबददल गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे याचे मार्गदर्शना खाली सहायक फौजदार साबळे हे करत आहेत. ही कारवाई  पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केजळे, पो.स.ई शुभम चव्हाण, पोहवा जाधव पो अं रावडे पो.अं. सचिन भोई पो.अं शिंदे पो.अं. आव्हाड पो.अ. थोरात यांनी केली.

Story img Loader