बेकायदा सावकारी करून एका व्यावसायिकाला धमकावणाऱ्या डाॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी डाॅ. विनोद गोपीचंद मेहेर (वय ३९, रा. आळेफाटा, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिर्यादीचा ॲग्रो कमोडिटी ट्रेंडिंगचा व्यवसाय आहे. आळेफाटा येथील डाॅ. विनाेद मेहेर यांना व्यवसायात पैसे गुंतविण्यास सांगितले. तेव्हा डाॅ. मेहेर यांनी गुंतवणूक करण्यास उत्सुक नसल्याचे सांगितले होते. चार टक्के व्याजाने पैसे पैसे देतो, असे सांगून डाॅ. मेहेर यांनी व्यावसायिकाला एप्रिल २०१९ मध्ये २५ लाख रुपये दिले. त्यापैकी दोन लाख रुपये त्यांनी व्याज म्हणून कापून घेतले. ऑक्टोबर २०१९ पर्यंत व्यवहार सुरळीत सुरू होता. त्यानंतर व्यावसायिकाने आणखी २५ लाख रुपये व्याजाने घेतले. फेब्रुवारी आणि मार्च २०२० मध्ये व्यावसायिकाने ३४ लाख ५० हजार रुपयांचा गहू इंदूर येथून घेतला. त्यासाठी ते इंदोर येथे गेले. त्यावेळी करोना निर्बंधामुळे व्यावसायिक इंदूर येथे अडकला.

हेही वाचा – “पुण्यात ब्राह्मण समाजात खदखद आहे, ही नाराजी…”, हिंदू महासंघाचा भाजपाला गर्भित इशारा; स्वत:चा उमेदवार देण्याचे सूतोवाच!

हेही वाचा – “…तर काँग्रेसने कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, हे घोषित करावं”; चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंना आव्हान

व्यावसायिकाला गहू मिळाला नाही तसेच पैसेही मिळाले नाहीत. पुण्यात आल्यानंतर व्यावसायिकाने इंदापूर, कराड येथील व्यापाऱ्यांशी व्यवहार केला होता. त्या दोघांचे करोनामुळे निधन झाले. व्यावसायिकाचे नुकसान झाले. डाॅ. मेहेर यांना व्यावयासिक रक्कम परत करू शकला नाही. त्यानंतर सप्टेबर २०२० मध्ये व्यावसायिक मुंबईला निघाला होता. त्यावेळी डाॅ. मेहेर आणि गुंड मित्रांनी व्यावसायिकाला वाटेत अडवून धमकाविले. डाॅ. मेहेर साथीदारांसह व्यावसायिकाच्या पुण्यातील घरी आले. व्यावसायिक आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. व्यावसासिकाने गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला. या प्रकरणी तपास करून बेकायदा सावकारी प्रकरणी डाॅ. मेहेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.