किरकोळ वादातून टोळक्याने तरुण, त्याचा मित्र आणि आईला मारहाण करुन घरावर दगडफेक केल्याची घटना पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत घडली. या प्रकऱ्णी तिघांना अटक करण्यात आली असून साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशन उर्फ दिनेश गौड (वय १९), राकेश रमेश सोरटकर (वय २१), रितेश रमेश सोरटकर (वय १८, तिघे रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी चार ते पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे : सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईला मारहाण
याबाबत दत्तात्रय कानगुडे (वय २६, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दत्तात्रय कानगुडे यांचा मावसभाऊ सागर निवंगुणे याची आरोपी किशन गौड याच्याशी वादावादी झाली होती. दत्तात्रय आरोपी किशनच्या घरावर जाब विचारण्यासाठी गेले. त्या वेळी आरोपी किशनने साथीदारांना तेथे बोलावून घेतले. दत्तात्रय यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपी रियाज शेख, सुनील देडगे यांनी दत्तात्रय यांच्या आईला दांडक्याने मारहाण केली. परिसरात दहशत माजवून घरांवर दगडफेक केली. पोलीस उपनिरीक्षक राजेश पुरी तपास करत आहेत.