पोलीस खबऱ्यांच्या बळावर अनेक गंभीर गुन्ह्य़ांचा छडा लावतात. पुणे पोलीस दलात तपासात वाकबगार मानल्या जाणाऱ्या पोलिसांनी नुकताच मोठा शस्त्रसाठा जप्त केला. आपल्याला नेहमी जी स्टेनगन चित्रपटात दिसते तशी स्टेनगनदेखील पोलिसांनी जप्त केली. शिवाय पाच पिस्तुले, ६९ काडतुसेही जप्त करण्यात आली. हा सर्व शस्त्रसाठा रवी पुजारी टोळीतील गुंडाकडून पुणे पोलिसांनी जप्त केला. तर दुसऱ्या एका कारवाईत मध्यप्रदेशातून शस्त्रे विक्रीसाठी पुण्यात आलेल्या एका महिलेलाही पुण्यात पकडण्यात आले. शस्त्रास्त्रांच्या तस्करीत पुण्यात महिलेला पकडण्याची बहुधा ही पहिलीच वेळ. या दोन्ही कारवाया पोलिसांनी खबऱ्यांच्या बळावर यशस्वी केल्या.
लोणावळ्यातील सादिक बंगाली हा रवी पुजारी टोळीतील खतरनाक नेमबाज (शूटर) म्हणून ओळखला जातो. सन २००६ मध्ये त्याने दिग्दर्शक महेश भट यांच्यावर मुंबईतील जुहू भागात गोळीबार केला होता. मुंबईतील जुहू, खार, घाटकोपर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. लोणावळ्यातील गुंड किसन परदेशी आणि त्याने मिळून दोन तरुणांचे अपहरण करून त्यांचे दोन वर्षांपूर्वी खून केले होते. परदेशीला ग्रामीण पोलिसांनी पकडले होते. मात्र, बंगाली पोलिसांना सापडला नव्हता. बंगाली आणि त्याचा साथीदार पुण्यात वास्तव्यास आले होते आणि स्वारगेट एसटी स्थानकाच्या परिसरात ते पिस्तूल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.
ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ती पडताळून पाहिली आणि वरिष्ठांना दिली. क्षणाचाही विलंब न लावता हवालदार क्षीरसागर, योगेश जगताप यांच्यासह तपासपथकातील पोलिसांनी एसटी स्थानकाच्या परिसरात सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार बंगाली आणि त्याचा साथीदार रिहान सय्यद तेथे आले. पाठीवर सॅक लावून आलेल्या या दोघांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या पथकाने टिपल्या आणि कोणताही विलंब न लावता बंगाली आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे असलेलल्या सॅकची तपासणी करण्यात आली तेव्हा पोलीसदेखील चक्रावून गेले. सॅकमध्ये कार्बाईन (स्टेनगन), पिस्तुले आणि पिशव्यांमध्ये भरलेली काडतुसे असा शस्त्रसाठा होता. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर एखाद्या गुंडाकडून शस्त्रसाठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ होती.
या घटनेनंतर पोलिसांच्या दृष्टीने खबऱ्यांचे जाळे तगडे असणे महत्त्वाचे असते. अनेकदा खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गंभीर गुन्ह्य़ांचा छडा लागतो, असे सांगून सहपोलीस आयुक्त रामानंद यांनी या पथकातील पोलिसांची पाठ थोपटली आणि त्यांना रोख बक्षीसदेखील जाहीर केले.
देशी बनावटीच्या पिस्तुलाला गुन्हेगारांच्या सांकेतिक भाषेत ‘घोडा’ असे म्हटले जाते. एकेकाळी मुंबईतील गुन्हेगारांनी बेकायदेशीर बाळगलेल्या शस्त्रांवर दहशत निर्माण करून सामान्यांना वेठीस धरले होते. दहशतीच्या बळावर गुन्हेगारी विश्वात वर्चस्व प्रस्थापित केले होते. मुंबईतील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यात आली. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत पुण्यात संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी बस्तान बसविले. प्रतिस्पर्धी टोळीवर वर्चस्व मिळवण्यासाठी तसेच खंडणी उकळण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पिस्तुलांचा वापर केला जातो. अगदी गल्लीबोळांमधील स्वयंघोषित दादांकडेही त्यामुळे पिस्तुले आली आहेत. पुणे शहरात बेकायदेशीर पिस्तूल विक्रीचे मोठे जाळे सक्रिय आहे. आठवडाभरात पुणे पोलिसांनी पिस्तुले, स्टेनगन, काडतुसे जप्त करून या ‘घोडे’बाजाराला लगाम घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
शस्त्रास्त्र तस्करीत महिला..
मुंबईतील गुन्हेगारी वर्तुळात एकेकाळी जेनाबाई या नावाचा दबदबा होता. सन १९६० च्या दशकात कुख्यात तस्कर हाजी मस्तान, वरदराजन मुदलीयार आणि जेनीबाई यांनी त्यांचे साम्राज्य उभारले होते. एका अर्थाने ती मुंबईतील माफियांच्या राज्यातील ‘क्वीन’ होती. पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने लष्कर परिसरात अरोरा टॉवर्सजवळ मध्य प्रदेशातील बडवानी भागातून पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या जेनीबाई तानी बारेला (वय ५०) या महिलेला गेल्या आठवडय़ात पकडले. पारंपरिक वेशात असलेल्या जेनीबाईकडून तीन पिस्तुले आणि २१ काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून जेनीबाईला पकडण्यात आले. शैलेश जगताप यांचे खबऱ्यांचे जाळे मजबूत आहे. त्या बळावर त्यांनी आतापर्यंत सेवाकालावधीत तब्बल १५५ पिस्तुले पकडली आहेत. पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच शस्त्रास्त्र तस्करीत महिलेला अटक केली. जेनीबाईला पकडल्यानंतर मुंबईतील ‘माफियाक्वीन’ जेनाबाईची आठवण पोलिसांना प्रकर्षांने आली.