एका कंपनीच्या बँक गॅरंटीचे कागदपत्र दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात रुपी बँकेच्या बुधवार पेठ शाखेचे व्यवस्थापक व उल्का इंडस्ट्रीज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजवान आलम सिद्दीकी (वय ४०, रा. मॅग्नम बंगला, अंधेरी वेस्ट, मुंबई) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी हे सुनील हायटेक इंजिनिअरिंग कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. त्यांच्या कंपनीच्या बँक गॅरंटीच्या मुदतवाढीचे एक कोटी ६७ लाख रुपये किमतीचे मूळ कागदपत्र रुपी बँकेत असून, हे कागदपत्र कोणतीही परवानगी न घेता उल्का कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात ठेवण्यात आला आहे.

Story img Loader