रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या वाकड परिसरातील चार हॉटेलवर सहायक पोलीस आयुक्त स्मिता पाटील यांच्या पथकाने छापा घालून दहा जणांना अटक केली आहे. यावेळी ५७ हजाराचे विदेशी मद्य व बीअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
हिंजवडी हद्दीतील काही हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू असतात, त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे विदेशी दारूविक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने सहायक पोलीस आयुक्त स्मिता पाटील यांनी चतु:शृंगी व सांगवी पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार करून शनिवारी रात्री एकाच वेळी छापे मारले. यावेळी संबंधित हॉटेलच्या चालक-मालकांसह १० जणांना अटक करण्यात आली. या कारवाईच्या  वेळी मोठय़ा संख्येने आयटी क्षेत्रातील तरूण-तरुणी झिंगलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. ज्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली, तेथून पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नव्हती. तथापि, सहायक पोलीस आयुक्तांनी थेट कारवाई केल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा