पुणे : शहरात सायबर चोरट्यांनी उच्छाद मांडला असून फसवणुकीचे गुन्हे वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांकडून सामान्यांना गंडा घालण्यासाठी नवनवीन शक्कल लढविण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात दाखल होणारे सायबर फसवणूक प्रकरणातील अडीच लाख रुपयांहून जास्त रकमेचे गुन्हे आता सायबर पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तत्पर तपासासाठी अतिरिक्त कर्मचारी पुरविण्याचा निर्णय पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीच्या तक्रारी वाढत आहेत. या पूर्वी २५ लाख रुपयांहून जास्त रकमेचे गुन्हे सायबर पोलीस ठाण्याकडे सोपविले जात होते. २५ लाख रुपयांपेक्षा कमी रकमेची फसवणूक झाल्यास संबंधित गुन्हा पोलीस ठाण्यांकडे तपासासाठी सोपविला जात होता. शहरातील विविध पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढते आहे. तक्रारी वाढत असल्याने त्याचा ताण शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यावर पडत होता. सायबर पोलीस ठाण्यातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे तपासावर परिणाम झाला होता.

हेही वाचा – पुणे : गोदामातील आगीत तीन कामगारांच्या मृत्यू प्रकरणी व्यावसायिक अटकेत; वाघोलीतील दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी गुन्हा

तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी २५ लाख रुपयांहून जास्त रकमेची फसवणूक झाल्यास संबंधित गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. २५ लाख रुपयांहून कमी रकमेचे गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यांकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण विचारात घेता पोलीस ठाण्यातील सायबर गुन्ह्यांचा तपास संथगतीने होत असल्याचे दिसून आल्याने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी अडीच लाखांहून जास्त रकमेचे गुन्हे सायबर पोलीस ठाण्यांकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या वर्षी २४ हजार ४३४ तक्रारी

गेल्या वर्षी पुणे शहरात सायबर पोलीस ठाणे आणि स्थानिक पोलीस ठाण्यात एकूण मिळून २४ हजार ४३४ तक्रार अर्ज दाखल झाले होते. तक्रार अर्जांची पडताळणी केल्यानंतर ४३४ सायबर गुन्हे दाखल झाले होते. सायबर पोलीस ठाण्यात ३९४ आणि विविध पोलीस ठाण्यात ३८ गुन्हे दाखल झाले होते. यंदा मार्च महिनाअखेरीपर्यंत सायबर गुन्हेविषयक तीन हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा – पुणे : चांदणी चौकातील पुलाला सेनापती बापट यांचे नाव द्या; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

त्वरित तक्रार करण्याचे आवाहन

सायबर फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार करणे (गोल्डन अवर्स) गरजेचे आहे. त्वरित तक्रार केल्यास फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम परत मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तक्रारदारांनी त्वरित तपास करावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. आता अडीच लाख रुपयांहून जास्त रकमेचे गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात दाखल होणार असल्याने त्याचा फायदा तपासासाठी होईल. सायबर चोरट्यांकडून गुन्हे करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती जाणून घेऊन गुन्ह्याची उकल करणे शक्य होईल.