पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे पूर्ववैनस्यातून १९ वर्षीय सराईत गुन्हेगाराचा तब्बल ४० ते ४५ वार करून निर्घृण खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. अॅल्विन रवी राजगोपाळ (रा.जयभीम नगर, दापोडी) असं मयत गुन्हेगाराचे नाव आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक घरात घुसून अॅल्विनवर हल्ला करण्यात आला. यात तो जखमी झाला आणि कसाबसा त्याने घरातून चिंचोळ्या गल्लीतून पळ काढला. मात्र, हल्लेखोरांनी त्याला गल्लीत गाठत त्याच्यावर कोयत्याने ४० ते ४५ वार करून ठार केले. याप्रकरणी चार आरोपींना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर एकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी क्लेरा राबर्ट कीटटो यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक राजू चव्हाण, रुपेश दिलीप संकपाळ, राहुल वीर उर्फ पप्या, निखिल, सनी गजभिव (सर्व राहणार दापोडी) अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावं असून यातील चार जणांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा