महापालिकेची मालकी असलेल्या पं. नेहरू स्टेडियम ( Nehru Stadium) येथे संध्याकाळीही क्रिकेट खेळता यावे यासाठी नव्याने करण्यात आलेल्या प्रकाश व्यवस्थेमध्ये गंभीर त्रुटी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. मैदानात उभारण्यात आलेल्या दिव्यांच्या चार खांबांपैकी दोन खांब चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आल्यामुळे त्याचा थेट फटका खेळाडूंना बसणार आहे. विशेष म्हणजे या मैदानावर आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील सामने होणार नसतानाही प्रकाश व्यवस्थेचा घाट घालण्यात आला असून हा सर्व खटाटोप कोणासाठी सुरु आहे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पंडित नेहरू स्टेडियमवर संध्याकाळी खेळ खेळता यावेत यासाठी प्रकाश व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला होता. त्यासाठी विद्युत विभागाकडून मैदानाच्या चारही बाजूस प्रत्येकी एक याप्रमाणे चार खांब उभारण्यात आले आहेत. या कामासाठी सव्वातीन कोटी रुपयांचा खर्च विद्युत विभागाकडून करण्यात आला असून सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र विद्युत विभागाने खांब बसविताना तांत्रिक चूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

England vs India match Cricket bookies active for betting Nagpur news
इंग्लंड विरुद्ध भारत : सट्टेबाजीसाठी क्रिकेट बुकी सक्रिय; दोन हजार कोटींपेक्षा जास्त…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Ranji Trophy Cricket Tournament Mumbai vs Meghalaya match sports news
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईला विजय अनिवार्य,आजपासून मेघालयाशी गाठ; बडोदा विरुद्ध जम्मूकाश्मीर लढतीवरही लक्ष
Cricketer from Dombivli Shreyas Gurav has been selected in mumbai Ranji team
डोंबिवलीच्या श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
Jasprit Bumrah Wins ICC Mens Test Cricketer of The Year 2024 With Historic Performance
Jasprit Bumrah: ‘गेमचेंजर’ जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी, ICC चा ‘हा’ पुरस्कार जिंकणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज

यासंदर्भात क्लब ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष बाळासाहेब थोरवे यांनी महापालिकेकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारणा केली होती. क्रिकेटची खेळपट्टी ही नेहमी दक्षिण-उत्तर अशी असते. त्यादृष्टीनेच प्रकाश व्यवस्था होणे अपेक्षित होते. मात्र स्टेडियममधील प्रकाश व्यवस्था चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावर प्रकाशझोत येणार असून सामने खेळतानाही खेळाडूंना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यासंदर्भात खांब उभारताना महाराष्ट्र क्रिकेट संघटना(एमसीए), भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) किंवा या क्षेत्रातील अन्य तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात आले होते का, अशी विचारणा थोरवे यांनी केली होती. मात्र कोणाचाही सल्ला न घेता ही यंत्रणा उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे स्वमालकीचे क्रिकेट स्टेडिमय गहुंजे येथे आहे. त्यामुळे नेहरू स्टेडियम येथे होणारे क्रिकेटचे सामने आता बंद झाले आहेत. भविष्यातही सामने होण्याची शक्यता कमी आहे. या परिस्थितीमध्येही प्रकाश व्यवस्था उभारण्याचा घाट का घालण्यात आला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. सध्या नेहरू स्टेडियम येथे काही कंपन्यांचे सामने होतात. त्यासाठी ठरावीक रक्कम आकारून त्यांना मैदान उपलब्ध करून दिले जाते. ही रक्कम आधीच जादा असताना आता प्रकाश व्यवस्थेसाठीचे भाडेही सामन्यांच्या आयोजकांना द्यावे लागणार आहे. मुळात सामनेच कमी होतात. त्यामुळे वाढीव भाडे मान्य करून या मैदानावर सामने होतील का, याबाबतही संदिग्धता आहे. त्यामुळे हा खर्चही वाया जाणार असल्याचेच दिसते आहे.

 

अहवालातून तांत्रिक त्रुटी स्पष्ट

महापालिका प्रशासनाकडून या कामात त्रुटी नसल्याचा दावा करण्यात येत असला तरी घाईगडबडीत केलेल्या या कामात अनेक तांत्रिक चुका असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याशीही यासंदर्भात काही दिवसांपूर्वी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर कामाचा आढावा घेण्यासाठी गेल्या आठवडय़ात बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. प्रकाश व्यवस्था कामासाठी जे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार नेमण्यात आले होते, त्या सर्वाना या बैठकीत बोलाविण्यात आले होते. त्याबाबतचा अहवालही महापालिकेच्या विद्युत विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यानंतरही त्रुटी नसल्याचा दावा करण्यात येत आहे. घाईगडबडीने केलेल्या या कामाचा फटका महापालिकेलाच बसणार असून कोटय़वधी रुपयांचा खर्चही वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मैदानात उभारण्यात आलेल्या प्रकाश व्यवस्थेच्या खांबांच्या कामात कोणत्याही त्रुटी नाहीत. गहुंजे येथे ज्या कंपनीने ही व्यवस्था उभारली आहे त्याच कंपनीकडून हे काम करण्यात आले आहे. खांबाची रचना आणि ती उभारणीचे काम विद्युत विभागाकडून करण्यात आले आहे. 

 श्रीकृष्ण चौधरी, प्रमुख, विद्युत विभाग

Story img Loader