पुणे : कोरेगाव भीमा येथील हिंसाचार हे देशाअंतर्गत गुप्तहेर संघटना आणि पोलिसांना आलेले अपयश (इंटेलिजन्स फेल्युअर) आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्य सचिव सुमित मलिक आणि तत्कालीन पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची उलटतपासणी घेण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पुन्हा केली. याबाबत आंबेडकर यांच्याकडून २४ जुलै रोजी शपथपत्र सादर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात उलटतपासणी घेण्यात येत आहे. त्याकरिता विविध राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, या भागातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आदी विविध जणांची साक्ष, उलटतपासणी घेण्यात आली आहे.

हेही वाचा – पुणे : फलक काढताना विजेचा धक्का बसून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

दरम्यान, चौकशी आयोगाने आंबेडकर यांना शपथपत्र सादर करण्यासाठी बोलविले होते. यापूर्वी दोन वेळा आंबेडकर यांना आयोगाने बोलविले होते. मात्र, ते येऊ शकले नव्हते. आयोगाने तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस, तत्कालीन मुख्य सचिव मलिक आणि तत्कालीन पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक हक यांची उलटतपासणी घेण्यासाठी आयोगासमोर पाचारण करण्याबाबत आंबेडकर यांनी आयोगाला पत्र दिले होते. सोमवारी (१७ जुलै) आयोगासमोर आंबेडकर यांनी पुन्हा हीच मागणी केली. त्यावर आयोगाने त्यांचे म्हणणे शपथपत्राद्वारे सादर करण्याची सूचना आंबेडकर यांना केली. त्यावर २४ जुलै रोजी ही मागणी शपथपत्राद्वारे सादर करू, असे आंबेडकर यांनी आयोगाला सांगितले.

हेही वाचा – “दुर्दैवाने यंदाची दिवाळी अजित पवार यांना एकट्याला साजरी करावी लागेल”, प्रकाश आंबेडकरांचा टोला

कोरेगाव भीमा येथील हिंसाचार हे देशांतर्गत गुप्तहेर संघटना आणि पोलिसांना आलेले अपयश (इंटेलिजन्स फेल्युअर) आहे. या धर्तीवर फडणवीस, मलिक आणि हक यांना पाचारण करण्याची मागणी असल्याचे आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.