लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : वडगाव शेरी मतदार संघातील वडगाव शेरी, खराडी, येरवडा, लोहगाव, विश्रांतवाडी परिसरातील मतदान केंद्रावर पहिल्या टप्यात मतदानासाठी गर्दी झाली. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. सकाळी नऊपर्यंत मतदान कमी झाले होते. त्यानंतर मतदान केंद्रावर गर्दी झाल्याचे दिसून आले.

वडगाव शेरी मतदार संघातील येरवडा, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी, चंदननगर, खराडी, वडगाव शेरी भागातील मतदान केंद्रावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

आणखी वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोथरूडमध्ये पहिल्या दोन तासात मतदानासाठी उत्साह

वडगाव शेरी मतदार संघातील निवडणूक चुरशीची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार, आमदार सुनील टिंगरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार, माजी आमदार बापू पठारे समाेसमोर आहेत. टिंगरे आणि पठारे यांच्यातील लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत वडगाव शेरी मतदार संघात ४६.९७ टक्के मतदान झाले होते.

आणखी वाचा-कसब्यात शांततेत मतदान; दोन तासांमध्ये ७.४४ टक्के मतदारांनी बजावले कर्तव्य

मतदानाच्या पहिल्या टप्यात वडगाव शेरीतील विविध मतदान केंद्रांवर सकाळी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा, लक्ष्मीनगर येथील उर्दू हायस्कूल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातील मोझे विद्यालय, भिकू पठारे विद्यालय, वडगाव शेरीतील सुंदराबाई मराठे शाळा, विश्रांतवाडीतील विठ्ठलराव गाडगीळ विद्यालय, लोहगाव येथील खेसे विद्यालयातील मतदान केंद्रात मतदारांची गर्दी झाली होती.

वडगाव शेरी मतदारसंघात विमाननगर, खराडी, कल्याणीनगर परिसरातील उच्चभ्रु सोसायट्या आहेत. या भागातील मतदान केंद्रात सकाळी नऊनंतर गर्दी झाली होती.