गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला असून खरेदीसाठी मंडई, तुळशीबाग परिसरात शनिवारी गर्दी झाली. शहर तसेच उपनगरातून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी आल्याने मध्यभागात वाहतूक कोंडी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गणेशोत्सवाचा प्रारंभ बुधवारी ( ३१ ऑगस्ट) रोजी होणार असून गणेशोत्सवातील सजावट तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी शनिवारी (२७ ऑगस्ट) मंडई, तुळशीबाग परिसरात गर्दी केली होती. मध्यभागात खरेदीसाठी अनेक जण मोटारीतून आले होते. मोटारींमुळे वाहतूक कोंडीत भर पडली. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मंडई परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याच्या पाहायला मिळाले. बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता तसेच मध्यभागातील गल्ली बोळातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

हेही वाचा – पुणे : जुने मखर द्या, नवीन घेऊन जा ; अनिल कांबळे यांचा अभिनव उपक्रम

रविवार पेठेतील कापडगंज, बोहरी आळी परिसरात सजावट साहित्याच्या खरेदीसाठी झाली होती. मंडई परिसरातील वाहनतळावर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने अनेकांनी नदीपात्रातील रस्त्यावर वाहने लावली होती. सदाशिव पेठ, नारायण पेठेतील गल्ली बोळात बेशिस्तपणे दुचाकी लावण्यात आल्याने गल्ली बोळातील वाहतूक विस्कळीत झाली तसेच कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.

पोलिसांची घातपातविरोधी तपासणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात घातपात विरोधी तपासणी केली. बाँब शोधक नाशक पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रंगीत तालीम घेतली. त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील वाहतूक शनिवारी दुपारी काही काळ विस्कळीत झाली.