ख्रिसमस सण आणि विकेंडमुळं लोणावळ्यात काही प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाल्याचं चित्र आहे. मुंबईसह राज्यभरातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. लोणावळा हे पर्यटकांच विशेष आकर्षण असलेलं ठिकाण आहे. त्यामुळं दरवर्षी ख्रिसमस च्या निमित्ताने नागरिक लोणावळ्या येत असतात. करोनाचा उद्रेक परदेशात पाहायला मिळतो आहे. पण, भारतात कोविड चा प्रादुर्भाव नाही. ज्या वेळी कोविड ची नियमावली जाहीर होईल तेव्हा मास्क वापरू अस पर्यटकांनी यावेळी आवर्जून सांगितले.
हेही वाचा- पुणे शहरात करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात; मुखपट्टीचा वापर करण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे आवाहन
लोणावळा हे पर्यटकांच विशेष आकर्षण आहे. नूतन वर्षांच स्वागत असो की ख्रिसमस, पावसाळा असो की उन्हाळा या दिवसांमध्ये देखील लोणावळ्यात येण्याचा निमित्त पर्यटक शोधत असतात. आज विकेंड आणि ख्रिसमसमुळ पर्यटकांची पाऊल आपसूकच लोणावळाकडे वळतात. टायर पॉईंट, लायन्स पॉईंट इथे पर्यटक कुटुंबासह दाखल झाले आहेत. अनेक जण मुंबईसह परराज्यातून लोणावळ्यात आले आहेत. एकीकडे लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी पर्यटकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, पर्यटक विनामस्क असल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी प्रशासनाने कोविडची नियमावली जाहीर होताच नियमांच पालन करू अस सांगितलं आहे. त्यामुळं सध्यातरी आनंद लुटा अस आवाहन अनेकांनी तरुण, तरुणींना केलं आहे.