पुणे : मार्केट यार्डातील घाऊक फळभाज्यांची आवक स्थिर असून, मागणी कमी झाल्याने काकडी, फ्लाॅवर, काकडी, वांगी, गाजर या फळभाज्यांच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ टेम्पो पावटा, कर्नाटक आणि गुजरातमधून ४ ते ५ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून २ टेम्पो शेवगा, राजस्थानातून ९ ते १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून १४ ते १५ ट्रक मटार, तामिळनाडूतून २ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून १२ ते १३ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
share market Major indices, share market ,
स्फुरणाअभावी निर्देशांकांना सुस्ती
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!

हेही वाचा – पुणे : वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, बोपोडी परिसरातील घटना

पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो नऊ ते दहा हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १४ ते १५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंग ४० ते ५० गोणी, कांदा १०० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३० ते ३५ टेम्पो बटाट्याची आवक झाली.

मेथी, कांदापात, शेपू चुक्याच्या दरात अल्पशी वाढ

गेल्या आठवड्याच्या तुलनेत मेथी, कांदापात, शेपू, चुका या पालेभाज्यांच्या दरात अल्पशी वाढ झाली. कोथिंबिर, करडईच्या दरात घट झाली आहे. चाकवत, पुदिना, राजगिरा, अंबाडी, चवळई, पालक, हरभरा या पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर एक लाख जुडी, तसेच मेथीच्या ६० ते ७० हजार जुडींची आवक झाली. बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १००० ते १५००, मेथी – ७०० ते १२००, शेपू – ५०० ते १५००, कांदापात- १२०० ते १७००, चाकवत – ५०० ते ८००, करडई- ४०० ते ७००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ८००, चुका – ६०० ते १०००, चवळई- ५००-८००, पालक- १०००-१५००, हरभरा गड्डी – ८०० ते १५००.

हेही वाचा – कल्याणीनगर भागातील हॉटेलमधून चार लाखांची रोकड चोरीला

डाळिंब, मोसंबी, कलिंगड, खरबूज, पपईच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील फळबाजारात लिंबांच्या दरात घट झाली. डाळिंब, मोसंबी, कलिंगड, खरबूज, पपई, तसेच जुन्या बहारातील मोसंबीच्या दरात वाढ झाली आहे. सीताफळ, अननस, बोरे, संत्री, नवी बहारातील मोसंबी, पेरू, चिकूचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी जुन्या आणि नव्या बहारातील मोसंबी मिळून ५० ते ६० टन, संत्री ६० ते ७० टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबांची दोन हजार गोणी, कलिंगड १५ ते २० टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू १००० ते १२०० प्लास्टिक जाळी (क्रेट), बाेरे अडीच हजार गोणी, सीताफळ १० ते १५ टन अशी आवक झाली.

Story img Loader