पुणे : परदेशातील ‘ड्रॅगन फ्रुट’ महाराष्ट्रातील मातीत रुजले असून, काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी त्याची मोठय़ा प्रमाणावर लागवड सुरू केली आहे. त्याची लागवड नगर, सोलापूर, सातारा भागातील शेतकरी करत आहेत. या फळांना मोठी मागणी असून चांगला दरही मिळत आहे.

ड्रॅगन फळांचा हंगाम जूनमध्ये सुरू होतो आणि नोव्हेंबपर्यंत चालतो. यंदा हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ड्रॅगन फळांना चांगले दर मिळाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत त्याच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ड्रॅगन फळ आरोग्यासाठी चांगले असल्याचे मानले जाते. आहारातील त्याच्या समावेशामुळे रक्तपेशी वाढतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून त्यांची मागणी वाढत आहे. त्याचा आकार आणि रंगही आकर्षक असतो, असे मार्केट यार्डातील ड्रॅगन फळांचे व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी सांगितले.

Randeep Surjewala promised Rs 7000 per quintal for soybeans if Maha Vikas Aghadi wins
सत्तेत आल्यास सोयाबीनला ७ हजार रुपये हमीभाव…रणदीप सिंग सुरजेवाला यांची घोषणा…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

हेही वाचा >>>पुणे : श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘शरद पवार ठरवतील तेच..’

मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज १५ ते २० टन आवक होते. लाल रंगाच्या एक किलो ड्रॅगन फळाचे दर प्रतवारीनुसार ४० ते १२० रुपये आहेत. पांढऱ्या रंगाच्या ड्रॅगन फळाचे दर ३० ते ९० रुपये आहेत. पांढऱ्या फळाच्या तुलनेत लाल फळाला चांगली मागणी आहे. येत्या काही दिवसांत त्याची आवक आणखी वाढणार आहे. एका फळाचे वजन साधारणपणे १०० ते ६०० ग्रॅम असते, असे सुपेकर यांनी सांगितले.

‘फळ प्रक्रिया उद्योग सुरू करा’

शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. महाराष्ट्रात ड्रॅगन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ज्यूस विक्रेते, तसेच आईस्क्रीम उत्पादकांकडून ड्रॅगनला मागणी वाढत आहे. शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. ड्रॅगन फळाच्या लागवडीला कमी पाणी लागते. हे फळ पाच ते सहा दिवस टिकते. गुजरातमधील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून त्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे, असल्याचे सुपेकर आणि आंबेकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>शिवछत्रपतींचे राज्य हे रयतेचे; शरद पवार यांचे प्रतिपादन

नगर, सोलापूर, साताऱ्यात लागवड

गेल्या तीन ते चार वर्षांत नगर, सोलापूर, सातारा भागातील शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर ड्रॅगन फळांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. या फळाला पाणी कमी लागते. खडकाळ जमिनीवर त्याची लागवड होते. पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत फळधारणा होते. नगर, सोलापूर परिसरातील ड्रॅगन फळांची चव चांगली आहे, असे फळ व्यापाऱ्यांनी सांगितले.