पुणे : हवेली तालुक्यातील होळकरवाडी भागात गव्हाच्या शेतामध्ये अफूची लागवड केल्याचा प्रकार लोणीकाळभोर पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणला असून, तब्बल १ हजार ३७४ झाडे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या झाडांची किंमत ११ लाख ६० हजार एवढी आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

राजाराम दामोदर होळकर (वय ५०, रा. होळकरवाडी, ता. हवेली), बाळू किसन कटके (वय ५०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरात गांजा, मॅफेड्रोन या अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. लोणीकाळभोर पोलिसांचे पथक होळकरवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी होळकरवाडीकडे जाणाऱ्या ओढ्याच्या परिसरात चिमणी तलावाच्या शेजारी गव्हाच्या शेतात अफूची लागवड केल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने होळकर आणि कटके यांना पकडले. पोलिसांनी तेथे कारवाई केली.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

हेही वाचा – कसब्यात भाजपला अतिआत्मविश्वास नडला

हेही वाचा – कसब्यातील जनतेच्या आशीर्वादासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

११ लाख ६० हजार रुपये किंमतीची ११६ किलोग्रॅम अफू जप्त करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, उपनिरीक्षक अमोल घोडके, साळुंके, कुदळे, नानापुरे आदींनी ही कारवाई केली.