गानवर्धन संस्थेतर्फे गानप्रेमी रमेश बापट यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (२४ ऑगस्ट) मनोहर मंगल कार्यालय येथे सायंकाळी सहा वाजता गायन-वादनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये बालकलाकार रोहन भडसावळे याचे तबलावादन आणि युवा गायिका नूपुर काशिद हिचे शास्त्रीय गायन होणार आहे.
एस. पी. एम. शाळेत आठव्या इयत्तेत असलेला रोहन हा पं. सुरेश सामंत आणि सागर सामंत यांच्याकडून तबलावादनाचे मार्गदर्शन घेत आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे तबल्याची शिष्यवृत्ती त्याने संपादन केली आहे. उत्तरार्धात पं. मधुकर जोशी यांची शिष्या नूपुर काशिद हिचे गायन होणार आहे. तिला पं. रामदास कामत, शुभदा दादरकर, रजनी जोशी, श्रीकांत दादरकर आणि अरिवद पिळगावकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. केंद्र सरकारच्या गायन शिष्यवृत्तीसह चतुरंग प्रतिष्ठानची संगीत शिष्यवृत्ती आणि महाराष्ट्र सरकारची भारतरत्न पं. भीमसेन जोशी शिष्यवृत्ती तिला मिळाली आहे.

Story img Loader