पिंपरी : कर संकलन विभागाकडून मालमत्ता कराची चालू मागणी व थकीत कर वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू आहे. मात्र, थकबाकीदारांसाठी महापालिका अभय योजना लागू करणार आहे का? याबाबत नागरिकांकडून सातत्याने विचारणा होऊ लागली होती. त्यावर महापालिकेची अभय किंवा विलंब शास्ती (दंड) माफीची योजना १ एप्रिल २०२२ पासून कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदारांना संपूर्ण कर भरावाच लागणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख २२ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांडून महापालिका कर वसूल करते. यासाठी शहरातील विविध भागांत कर संकलानासाठी १७ विभागीय कार्यालये आहेत. कर संकलन विभागाला २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपयांचे उदिष्ट देण्यात आले आहे. यासाठी कर संकलन विभागाने बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्ते करणे, वर्तमानपत्रात नावांची यादी छापणे, नळजोड खंडित करणे, थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यासह विविध प्रकारे करवसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

lavasa loksatta news,
लवासा प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट

हेही वाचा >>>भाजपकडून पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर

थकबाकीदारांकडे पालिकेचे पथक मालमत्ता जप्त किंवा कर वसूल करण्यासाठी गेल्यानंतर अनेक नागरिक अभय योजना कधी लागू होणार? किंवा शास्तीमध्ये माफी मिळणार आहे का? अशी विचारणा करत आहेत. महापालिकेची अभय योजना किंवा विलंब शास्ती माफीची योजना १ एप्रिल २०२२ पासून कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहे. तेव्हापासून महापालिका मालमत्ता कर विलंब दंडासह वसूल करत आहे. यापुढील काळात थकबाकीदारांसाठी कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही. त्यामुळे थकबाकीवर दंडाची रक्कम वाढण्यापेक्षा तत्काळ कर भरावा, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे.

८३० कोटींचा कर वसूल

चालू आर्थिक वर्षात आजअखेरपर्यंत ८३० कोटींचा कर वसूल झाला आहे. उर्वरित १८ दिवसांमध्ये जास्तीत-जास्त कर वसूल करण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

Story img Loader