पुणे : मद्यालयात बिल देण्यावरुन झालेल्या वादातून तीन ग्राहकांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मद्यालयातील १२ कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ओंकार रवींद्र आंधळकर (वय २६), गजानन शिवाजी खुडे (वय ४०), अजय धनंजय नाईक (वय ३५, तिघे रा. ओटा परिसर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मद्यालायातील १२ कामगारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओंकार आंधळकर याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>शिक्षण संस्थेतील रोखपाल महिलेकडून अडीच कोटींचा अपहार; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंधळकर, खुडे, नाईक हे बिबवेवाडीतील मद्यालयात गेले होते. मद्यालयातील बिल देण्यावरुन त्यांचा बारमधील कामगारांशी वाद झाला. त्यानंतर आंधळकर, खुडे, नाईक यांना बारमध्ये २० ते २५ मिनिटे कोंडून ठेवण्यात आले. त्यांना कामगारांनी बांबूने बेदम मारहाण केली. मारहाणीत तिघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे तपास करत आहेत.

Story img Loader