शहरातील केशकर्तनालयाच्या व्यावसायिकांनी दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये प्रत्येकी दहा रुपयांनी वाढ केली असून यामुळे आता दाढी ४० रुपये व कटिंग ८० रुपये होणार आहे. ही वाढ १ फेब्रुवारीपासून शहरात सर्वत्र लागू होणार आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण विशेष सभा शहर अध्यक्ष चंद्रशेखर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात ही दरवाढ सर्वानुमते निश्चित करण्यात आली. या वेळी कृष्णकांत जगताप, नानासाहेब आढाव, विजय माने आदी पदाधिकारी व शहरातील नाव्ही व्यावसायिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. लाईट बिल, टॅक्स, दुकान भाडे आणि साहित्यात झालेली वाढ यामुळे ही दरवाढ करण्यात आली असल्याचे या वेळी जगताप यांनी सांगितले.
दाढी आणि कटिंगच्या दरात प्रत्येकी दहा रुपयांनी वाढ
शहरातील केशकर्तनालयाच्या व्यावसायिकांनी दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये प्रत्येकी दहा रुपयांनी वाढ केली असून यामुळे आता दाढी ४० रुपये व कटिंग ८० रुपये होणार आहे.
First published on: 07-01-2015 at 03:05 IST
TOPICSदर वाढ
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cutting saloon shave rate hike