पुणे : बँक खातेदारांची बनावट डेबिट कार्ड (क्लाेन) करुन सायबर चोरट्यांनी भारती सहकारी बँकेची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सायबर चोरट्यांनी मुंबई, पुणे, दिल्लीसह, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रातून बनावट डेबिट कार्डचा वापर करुन खातेदारांचे पैसे चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत भारती सहकारी बँक लिमिटेडचे कार्यकारी संचालक सर्जेराव जगन्नाथ पाटील (वय ६२) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भारती सहकारी बँकेची मुख्य शाखा सदाशिव पेठेत आहे. सायबर चोरट्यांनी डिसेंबर २०२० ते २०२१ या कालावधीत बनावट डेबिट कार्ड (क्लोन) तयार करुन पुण्यातील सदाशिव पेठ, धनकवडी, धानोरी, आकुर्डी, कोथरुड, बाणेर, हडपसर, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, मुंबईतील वरळी, तसेच दिल्लीतील एटीएम केंद्रातून भारती सहकारी बँकेच्या खात्यातून एक कोटी आठ लाख १५ हजार ७०० रुपये लांबविले.

four online scams
डिजिटल अटक ते रोमान्स स्कॅम : ऑनलाइन घोटाळ्यांना लोक कसे बळी पडत आहेत? काय आहेत फसवणुकीचे नवीन प्रकार?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
digital arrest
‘डिजिटल अरेस्ट’चा मुद्दा पंतप्रधानांकडून अधोरेखित
fraud of 46 lakh with women by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून महिलांची ४६ लाखांची फसवणूक
rape case
खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचारी तरुणीशी अश्लील वर्तन; तक्रारीनंतर कंपनीकडून प्रकरण दडपण्याचा आरोप
cyber crime
सायबर गुन्हेगारांकडून खरेदीसाठी आमिष दाखवून फसवणूक
fda meswak
मुंबई: मेसवाक दंतमंजनवर एफडीएची कारवाई, ४१ लाख रुपयांचा साठा जप्त
Rajasthan gang arrested for deceiving couriers with drugs
पिंपरी : कुरीअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून फसवणार्‍या राजस्थानच्या टोळीचा पर्दाफाश; पाऊणकोटीचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा >>> पुणे मेट्रोला हिरवा कंदील! पंतप्रधान मोदींच्या हस्ते केवळ उद्घाटनाची औपचारिकता

सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्यासाठी ४३९ बनावट डेबिट कार्डचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बनावट एटीएम कार्डद्वारे १२४७ व्यवहार करण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वरुरे करत आहेत. काॅसमाॅस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला करुन काॅसमाॅस बँकेची एकूण मिळून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम चोरल्याची घटना ऑगस्ट २०१८ मध्ये घडली होती.