पुणे : समाजमाध्यमावर स्वस्तात दुचाकी विक्रीच्या जाहिरातीतून चोरट्यांनी एका तरुणाला एक लाख २९ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कात्रज भागात राहायला आहे. काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर तरुणाने समाजमाध्यमावर स्वस्तात दुचाकी विक्रीची जाहीरात पाहिली होती. त्यानंतर तरुणाने जाहीरातीतील प्रकाश कुमार नावाच्या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर प्रकाश कुमारने त्याला ओळखपत्र आणि पॅनकार्डचे छायाचित्र समाज माध्यमातून पाठविले. स्वस्तात दुचाकी विक्रीचे आमिष त्याला दाखविण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… पुणे : निवृत्त आयएएस अधिकारी महिलेच्या मुलाच्या नावाने बनावट प्राप्तिकर

हेही वाचा… पुणे : सधन असूनही अल्पभूधारकांचा लाभ घेणाऱ्यांत बारामतीची ‘बाजी’

त्यानंतर तरुणाने ऑनलाइन पद्धतीने प्रकाशकुमारच्या बँकखात्यात पैसे पाठविले. चोरट्याने बतावणी करुन वेळोवेळी एक लाख २९ हजार रुपये तरुणाकडून घेतले. दुचाकीबाबत विचारणा केल्यानंतर प्रकाशकुमारने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर प्रकाश कुमारचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber crime at pune city with a young man tmb 01