मॉल, एटीएम, तारांकित हॉटेलमध्ये क्रेडिट कार्डने व्यवहार करताना अशी कार्ड जे वापरतात त्यांच्या कार्डवरील गोपनीय माहिती चोरून बनावट क्रेडिट कार्ड तयार केली जातात, यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. कारण क्रेडिट कार्डवरील गोपनीय माहिती चोरून ती सायबर भामटय़ांना विकण्यात मॉल आणि तारांकित हॉटेलमधील अनेक कर्मचाऱ्यांचा हात असतो. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने केरळमधील सायबर भामटय़ांना नुकतेच पकडले आणि त्यातून ही माहिती समोर आली. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या या भामटय़ांकडून १३९ क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जप्त करण्यात आली आहेत. पुणे, मुंबई, हैद्राबाद, बंगळुरू या मोठय़ा शहरातील अनेक क्रेडिट कार्डधारकांची माहिती चोरून त्यांना या भामटय़ांनी गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये सायबर गुन्हे वाढले आहेत. त्यात अनेकजण फसले तरी त्याची तक्रारही दाखल केली जात नाही. लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून किंवा परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून सामान्यांना गंडा घातला जातो. तसेच क्रेडिट कार्डवरील गोपनीय माहिती चोरून त्याद्वारे बनावट कार्ड (क्लोन) तयार केले जाते. अशा बनावट कार्डचा वापर करून त्याद्वारे सोने तसेच महागडय़ा वस्तूंची खरेदी केली जाते. मुंढवा भागातील एका क्रेडिट कार्डधारकाला अशा पद्धतीने गंडा घातल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. या गुन्ह्य़ाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण स्वामी यांना खबऱ्यांमार्फत अशी माहिती मिळाली की, बनावट क्रेडिट कार्ड तयार करणारे भामटे हे काम केरळमध्ये करतात.

navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

ही माहिती समजल्यानंतर माहितीची शहानिशा करण्यात आली. त्यात पोलिसांना असे समजले की, हे भामटे अगदी दहावीपर्यंतच शिक्षण झालेले आहेत. मात्र बनावट क्रेडिट कार्ड तयार करण्यात ते वाकबगर असल्याचीही माहिती मिळाली. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे आणि सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, दीपक लगड, उपनिरीक्षक स्वामी यांनी तातडीने तपास सुरू केला. तपासाची दिशाही ठरवण्यात आली. सुरुवातीला काही प्राथमिक माहिती गोळा करण्यात आली. त्यात क्रेडिट कार्डचा वापर क रून पुण्यातील काही सराफांकडून सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी केरळमधील काहीजण बंडगार्डन रस्त्यावर येणार असल्याची ‘खबर’ पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे तेथे सापळा रचण्यात आला. अपेक्षेप्रमाणे तिघेजण तेथे आले आणि तिघांना तेथेच पकडण्यात आले. त्यांच्याकडून मोटार, १३९ क्रेडिट कार्ड, छपाईचे यंत्र, स्कीमर (माहिती चोरण्यासाठी वापरले जाणारे यंत्र) व मोबाईल संच जप्त केले.

अजमल के. टी. (वय २४), इरफान इब्राहीम (वय २४) आणि नूरमोहम्मद इब्राहीम (वय ३२ तिघे, रा. केरळ) यांना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेली माहिती धक्कादायक होती. या तिघांनी दुबईतून खरेदी करणाऱ्या क्रेडिट कार्डधारकांची माहिती चोरली होती. ही माहिती तेथील मॉल, तारांकित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना पुरविल्याची माहिती उघड झाली. या संदर्भात पोलीस निरीक्षक ताकवले व उपनिरीक्षक स्वामी यांनी माहिती दिली. या गुन्ह्य़ाची उकल करण्यासाठी राजू भिसे, अस्लम अत्तार, राजकुमार जाबा, संतोष जाधव, नितीन चांदणे, नीतेश शेलार, शिरीष गावडे, तौसिफ मुल्ला यांनी साहाय्य केले. केरळमधील या आरोपींकडून जवळपास शंभर मोकळी कार्ड (ब्लँक) जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित ३९ कार्डवर ग्राहकांची माहिती भरलेली आहे. तारांकित हॉटेलात जाणाऱ्या, एटीएम केंद्रात जाणाऱ्या, तसेच मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांची माहिती स्कीमरद्वारे चोरली जाते. तेथील कर्मचाऱ्यांचा त्यात हात असतो. ही माहिती चोरल्यानंतर ती एका सीडीत एकत्र केली जाते. गोपनीय माहिती भामटय़ांना विकणारी मोठी टोळी कार्यरत आहे. ग्राहकांची माहिती स्कीमरचा वापर करून मोकळ्या कार्डमध्ये भरण्यात येते. त्यानंतर छपाई यंत्राच्या साहाय्याने त्यावर ग्राहक आणि बँकेचे नाव चिटकविण्यात येते. अशा पद्धतीने बनावट कार्ड (क्लोन) तयार करण्यात आल्यानंतर भामटे त्याचा वापर करून सोन्याचे दागिने, महागडय़ा वस्तू, उंची कपडे यांची खरेदी करतात.

केरळमधील टोळीने पुणे, मुंबई, हैद्राबाद, बंगळुरू या शहरात बनावट कार्डचा वापर करून मोठी खरेदी केल्याचीही माहिती तपासात पुढे आली. सध्या त्यांच्याकडून पुण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे. मात्र, या टोळीकडून मोठय़ा शहरांतील अनेक क्रेडिट कार्डधारकांना गंडा घातला असणार असा पोलिसांचा अंदाज आहे.