पुणे : मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन चोरट्याने एकाच्या बँक खात्यातून एक लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोथरूडमधील गुंडावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई, औरंगाबादमधील कारागृहात रवानगी

दाखल तक्रारीनुसार तक्रारदार कात्रज भागातील दत्तनगर परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क साधला. मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली. मोबाइल क्रमांक वापरकर्त्याची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे चोरट्याने तक्रारदाराला सांगितले.

हेही वाचा >>> पुणे : तडीपार गुंडाला बेड्या, पिस्तुल जप्त; भवानी पेठेत गुन्हे शाखेची कारवाई

त्यानंतर चोरट्याने तक्रारदाराच्या बँक खात्याची माहिती घेतली. तसेच त्याने तक्रारादाराला एक सांकेतिक शब्द पाठविला. त्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातून त्याने एकूण एक लाख बाराशे रुपये लांबविले. खात्यातून पैसे काढून घेण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber crime in pune one lakh rupees robbed from bank account pune print news prd