लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणांच्या तक्रारी दाखल झाल्या असून, आता सायबर चोरट्यांनी तीन जणांची ३० लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका व्यावसायिक महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेला सायबर चोरट्यांनी समाजमाध्यमात संदेश पाठविला होता. समाजमाध्यमातील ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती (लाइक्स) मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतात. घरातून काम करण्याची संधी उपलब्ध असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

हेही वाचा… आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ;अवघ्या तीन दिवसात १६०० पेक्षा अधिक मुलांना लागण

महिलेला आमिष दाखवून चोरट्यांनी जाळ्यात ओढले. सुरुवातील महिलेला काही रक्कम दिली. त्यानंतर चोरट्यांनी बतावणी करुन महिलेकडून वेळोवेळी १७ लाख ८१ हजार रुपये उकळले. कर्वेनगर भागातील एका नागरिकाला आमिष दाखवनू चोरट्यांनी सात लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत एकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा… पुणे : तरुणींची छेड काढणारा ‘बकासूर’ अटकेत; कोयता जप्त

समाजमाध्यमातील ध्वनिचित्रफीत, तसेच मजकुरास दर्शक पसंती मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतात, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. अशाच पद्धतीने मांजरी भागातील एका तरुणाची फसवणूक करण्यात आली. चोरट्यांनी आमिष दाखवून तरुणाकडून पाच लाख ३१ हजार रुपये उकळले. याबाबत तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyber thieves cheated three people of rs 31 lakh in pune print news rbk 25 dvr