पुणे : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ७१ वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सायबर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.   तक्रारदार निवृत्त कर्नल आहेत. समाजमाध्यमातून चोरट्यांनी त्यांना एक संदेश पाठविला होता. समाजमाध्यमातील ध्वनिचित्रफितींना दर्शकपसंती (लाइक्स) मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

सुरुवातील चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यात काही पैसे जमा केले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांच्याशी पुन्हा संवाद साधला. त्यांना ऑनलाइन टास्क योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी दिलेल्या १८ बँक खात्यात वेळोवेळी दोन कोटी रुपये जमा केले. लष्करी अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम तसेच साठवलेली रक्कम चोरट्यांच्या खात्यात ४१ व्यवहारांद्वारे जमा केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश
Pegasus logo
Pegasus : “तीनशे भारतीयांचे व्हॉट्सॲप क्रमांक….”, पेगाससवर अमेरिकन न्यायालयाच्या निकाल; काँग्रेसने डागली तोफ

एप्रिल आणि मे महिन्यात चोरट्यांनी फसवणुकीचा प्रकार घडला आहे. फसवणूक झाल्यानंतर सुरुवातील लष्करी अधिकाऱ्याने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली नव्हती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चोरट्यांनी लष्करी अधिकाऱ्याला ज्या बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले होते. ती बँक खाती तसेच रक्कम गोठविण्याची विनंती पोलिसांनी बँकेकडे केली आहे, असे सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांनी सांगितले.

Story img Loader