पुणे म्हटले की पेन्शनरांचे शहर, सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर अशी वैशिष्टय़े कोणीही पटकन सांगेल. पुणे एके काळी सायकलींचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. तसे पाहिले तर सायकलींचा ब्रॅण्ड पुण्यानेच प्रसिद्ध केला. कालौघात शहराची ही ओळख केवळ नावापुरतीच राहिली. मात्र आता पुन्हा शहरात सायकलींची घंटा वाजणार आहे. ऐतिहासिक शहर ते स्मार्ट सिटी अशी वाटचाल करणाऱ्या पुण्यात पुन्हा सायकल प्रवास अनुभवता येणार आहे. भाडेतत्त्वावरील सायकल योजनेमुळे हे शक्य होत आहे. पुण्याचा हा ‘ब्रॅण्ड’ जपण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत शहराच्या वाहतुकीमध्ये प्रचंड आणि वेगाने बदल झाले आहेत. पूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सायकललाच प्राधान्य असायचे आणि वाहतुकीसाठी ते एकच साधन सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होते. सायकल हे आपल्या हक्काचे वाहन आहे, अशी भावना पुणेकरांच्या मनात घट्ट रुजली होती. शहरात आधुनिकतेचे वारे वाहू लागले आणि सायकलींची जागा दुचाकींनी घेतली. सायकली कालांतराने नाहीशा होत गेल्या आणि सायकलींचे शहर याऐवजी दुचाकींचे शहर असा प्रवास शहराने अनुभवला. शालेय असो किंवा महाविद्यालयीन जीवन असो जुन्या पिढीच्या जीवनाचा आवश्यक भाग असलेल्या सायकलींनी शहराच्या मनाच्या कोपऱ्यात खास जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. साठ-सत्तरच्या दशकात पुणे पेठांपुरतेच मर्यादित होते. शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सायकलींचाच वापर करण्यात येत असे. सायकल घरात असणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना सायकल दिल्यास त्यांना आनंद गगनात मावत नसे.
साधारणत: १९८५ नंतर पुणे चहूबाजूने विस्तारत गेले. औद्योगिक कंपन्या पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात आल्या. टांग्यांची जागा रिक्षा घेऊ लागल्या. त्याचप्रमाणे सायकलींची जागा दुचाकी वाहनांनी घेतली. मंडईच्या परिसरात तब्बल वीस सायकलींची दुकाने होती, ही सर्व दुकाने कालौघात बंद पडली आणि केवळ एक, दोनच दुकाने आता शिल्लक राहिली आहेत. दुचाकींचे पंक्चर काढणे, लहान मुलांच्या सायकलींची विक्री असे कालानुरूप बदल केल्याने अद्यापही काही सायकल दुकाने शिल्लक राहिली आहेत. शहराचा विस्तार होण्याआधी पुण्यात अनेकांचा सायकलींचा व्यवसाय होता. खडकी अॅम्युनेशन फॅक्टरीमध्ये सायकलींसाठी म्हणून वेगळी जागा होती. त्या ठिकाणी एका वेळी चारशे ते पाचशे सायकली लागत असत. पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झालेल्या कंपन्यांमध्येही सुरुवातीच्या काळात कामाला जाणारे कामगार सायकलींवरच यायचे. चार आणे, दहा पैसे, पन्नास पैसे, एक रुपया असे भाडे सायकलींसाठी एका तासाला असे. तर, साठ रुपये प्रतिमहिना असे भाडे असायचे. महिन्याला चारशे सायकली भाडय़ाने जात असत. विद्यार्थी, कामगार, मंडईमध्ये हमाली करणारे कामगार भाडय़ाने सायकल घेणे पसंत करायचे. अडीचशे रुपयांमध्ये सायकल विकत मिळत असे. केवळ सायकल दुरुस्तीसाठी आमच्या दुकानात दहा माणसे कामाला होती, अशी माहिती ‘रतन सायकल मार्ट’चे नंदकुमार मंडोरा यांनी दिली. शहराच्या मध्य भागातून सायकलच्या सुटय़ा भागांना अत्यंत अल्प मागणी आहे. हडपसर, वारजे, शिवणे, धायरी अशा उपनगरांमधून मागणी आहे. कारण या उपनगरांमध्ये राज्याच्या इतर भागातून आणि देशभरातून कामगार येऊन राहतात. त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीकरिता सायकल हेच माध्यम परवडण्यासारखे आहे, असे सायकलींचे सुटे भाग विकणारे कंपन्यांचे मध्यस्थ सांगतात. याबरोबरच पुणे शहर सोडून जिल्ह्य़ात अद्यापही सायकल वापरणाऱ्यांचे प्रमाण चांगले असल्याने त्या भागात सायकल व्यवसाय अद्याप तग धरून आहे. पुण्यात गरजेपेक्षा हौस म्हणून सायकल चालविणाऱ्यांचा टक्का चांगला आहे. अनेक प्रतिष्ठित मंडळी व्यायामाकरिता, दुर्ग, गड, किल्ल्यांवर भ्रमंती करण्यासाठी सायकलींचा वापर होतो. अॅटलास, हक्र्युलस, हीरो, रायले, हम्बर, बीएससी या कंपनींच्या सायकली पुण्यात वापरल्या जात असत. आता रेन्जर, सेन्शल, फॅण्टम अशा विविध कंपन्यांच्या सायकली बाजारात उपलब्ध आहेत. नव्या सायकली व्यायाम, ट्रेकिंग, शाळकरी विद्यार्थी अशा विविध वयोगटांसाठी चार हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, असेही मंडोरा सांगतात. सायकलींचे शहर ही ओळख टिकविण्यासाठी पुण्यातील अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्ती सातत्याने प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना आता प्रशासकीय बळ मिळणार आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने ५ डिसेंबरपासून औंध आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रायोगिक तत्त्वावर तीनशे सायकल शेअरिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. अध्र्या तासाकरिता एक रुपया भाडे आकारण्यात येत आहे. या योजनेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. विद्यापीठाबरोबरच औंध भागातही दोनशे सायकली प्रायोगिक तत्त्वावर पुढील तीन महिन्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक सायकलला बारकोड लावण्यात आले आहेत. याकरिता पेटीएमच्या माध्यमातून पैसे भरता येतात. औंध आणि विद्यापीठात अनुक्रमे २०० आणि १०० सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच औंधमध्ये १० आणि विद्यापीठात ९ ठिकाणी सायकल घेऊन जाण्यासाठी व नेण्यासाठी जागा करण्यात आल्या आहेत. या सायकलींमध्ये जीपीएस तंत्रज्ञान बसविण्यात आले असल्याने सायकलींचे ठिकाण कळणार आहे.
पुणे महापालिकेकडून शहरात राबविण्यात येणाऱ्या सायकल योजनेत पुढील तीन महिन्यांत भाडेतत्त्वावर सायकली मिळणार आहेत. या योजनेत टप्प्याटप्प्याने एक लाख सायकली उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता सध्याच्या सायकल मार्गाची दुरुस्ती करून त्यामध्ये नव्याने ७५ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग उभारण्यात येणार आहेत. सायकल विक्रेते, त्यांची दुरुस्ती करणारे, सायकल भाडय़ाने देणारे दुकानदार आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे. या योजनेत खासगी कंपन्यांना सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सायकल खरेदीसाठी महापालिका गुंतवणूक करणार नाही. मात्र, ३३० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा पालिका उभारणार आहे.
prathamesh.godbole@expressindia.com