या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील दांडेकर पूल झोपडपट्टीत एका घरात सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत एक तरूण जखमी झाला आहे. अग्निशामक विभागाने या संदर्भातली माहिती दिली आहे. दांडेकर पुलाजवळच्या झोपडपट्टीत यशवंत गोपू चव्हाण यांच्या घरात स्वयंपाक केला जात होता. त्यावेळी अचानक स्फोट झाला. या स्फोटात ज्योती चव्हाण ही तरूणी जखमी झाली आहे. तिला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. सिलिंडरचा पाइप जुना असल्याने तो लिक झाला आणि स्फोट झाला असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

 

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cylinder blast in pune one injured
Show comments