लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे- सातारा रस्त्यावर डी मार्ट जवळील दुकानात मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये लागलेल्या आगीत दोन जण जखमी झाले.

सिलिंडरच्या स्फोटात दुकानाची पडझड झाली असून अग्निशमन दलाचे सात बंब दाखल झाले. जवांनानी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Story img Loader