पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या तीन क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोरील खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर लायटर गॅस भरण्याच्या बाटलीचा (सिलिंडर) स्फोट झाला. यामध्ये तीनजण किरकोळ भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
कामगार गोविंदा अंकुशे (वय ४२), संतोष सोनवणे (वय ३७) आणि पोलीस नाईक नीलेश सुभाष दरेकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर औंध येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, सर्वांची प्रकृती ठीक आहे.
हेही वाचा >>>हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयाच्या तीन प्प्रवेशद्वारासमोर वडापावची हातगाड़ी आहे. दुपारी अडीचच्या सुमारास चहा पिण्यासाठी एका हातगाडी जवळ पोलीस नाईक गेले होते. त्यावेळी अचानक गाडीवर लायटरमध्ये गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला. यामध्ये दरेकर यांचे दोन्ही हात आणि चेहऱ्याला भाजले आहे. कामगारदेखील जखमी झाले आहेत.