दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील धनकवडी येथील भारती विद्यापीठ परिसरात भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते झाले.यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना ‘डॉ.पतंगराव कदम स्मृती पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले.
पतंगराव कदम यांचा आज जन्मदिवस असून ते एक अतिशय आगळवेगळ व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी शून्यातून विश्व उभे केलं, ते सांगली जिल्ह्यातील एका गावातून आले.रयत शिक्षण संस्थेत कमवा व शिका या योजनेअंतर्गत ते शिकले. त्यानंतर पुण्यात आल्यावर काही काळ रयत शिक्षण संस्थेत काम देखील आणि त्यानंतर भारती विद्यापीठ सारखी शिक्षणसंस्था उभी केली. आज ही संस्था देशातील अनेक भागात विस्तारलेली आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी पतंगराव कदम यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
हेही वाचा >>> शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण
या कार्यक्रमा दरम्यान आदर पुनावाला ‘डॉ.पतंगराव कदम स्मृती पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले. पुनावाला यांचं विशेष कौतुक करत शरद पवार म्हणाले, आदर पुनावाला यांचे वडील सायरस पूनावाला आणि माझी मैत्री शालेय जीवनापासून आहे. आज पर्यन्तचा त्यांचा प्रवास मी पाहिला आहे.आज जगात सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली वॅक्सिन वापरली जाते. जगात जवळपास १६० देशात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केलेली वॅक्सिन वापरली जात आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, मी दोघे एकत्र शिकलो, आमच्या दोघात एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे अभ्यासात की लक्ष नव्हते.अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टीत अधिक लक्ष देत असायचो,त्यामुळे आम्ही दोघांनी एका गोष्टीत सात्यत ठेवले. आम्हा दोघांना परीक्षेत ३६ ते ४० च्या पुढे मार्क कधी मिळालेच नाही.आम्ही दोघे अभ्यास सोडून इतर ठिकाणी पुढे असायचो असं शरद पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
हेही वाचा >>> “मराठी माणसात व्यवसाय करण्याचं धाडस नाही”, चंद्रकांत पाटलांचं पुण्यात विधान; म्हणाले…
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना कार्यक्रमाच्या तासाभराने आले.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद हे भाषणास उभे राहिले होते. त्याच दरम्यान हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आगमन होताच,मी विश्वजीत कदम यांना सर्वांच्या वतीने सुचवतो की,हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच स्वागत करावं.पाहुणा आलायअसे म्हणताच सभागृहात एकाच हशा पिकला.