पुणे: मागील वर्षभराच्या कालावधीत भाजपचे नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनानंतर चंद्रकांत पाटील हे ज्या ठिकाणी कार्यक्रमास जातील. त्या ठिकाणी आणि त्यांच्या ताफ्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
या सर्व घडामोडी दरम्यान आज चंद्रकांत पाटील हे पुणे स्टेशन येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये एका कामासाठी आले होते. त्यावेळी तेथील डी.एड, बी.एड च्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्या मान्य करण्यात याव्या, यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाचा ताफा अडवून आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली. या घटनेमुळे बराच काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते.