पिंपरी: पिंपरीतील सेवा विकास बँकेला आर्थिक संकटात टाकणाऱ्या संचालकांकडूनच नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप झालेली सुमारे ४३० कोटी रूपयांची वसुली करावी, अशी मागणी पिंपरीचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी व व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा >>> पुणे : आता शाळेतही ‘अखंड भारत’ त्रिमितीय नकाशाचे अनावरण ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

या संचालकांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार करून बँकेला आर्थिक संकटात टाकले. परिणामी भारतीय रिझर्व्ह बँकेने कारवाई करून सेवा विकास बँकेचा परवाना रद्द केला. बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदाणी व त्यांचे सहकारी संचालक यास जबाबदार आहेत. सरकारने त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी डब्बू आसवानी यांनी या वेळी केली. आसवानी म्हणाले की, बँकेच्या संचालक मंडळाने केलेले बेकायदा कर्ज वाटप आणि अनियमित व्यवहारांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेऊन सहनिबंधकांनी बँकेचा लेखापरीक्षण अहवाल सादर केला. या लेखापरीक्षण अहवालात ४३० कोटी रुपये कर्ज वितरणाबाबत नोंदी घेण्यात आल्या आहेत. हे कर्ज संशयितरित्या वाटप झाले आहे. आर्थिक क्षमता नसलेल्या व्यक्तींना कर्ज वितरण करण्यात आले होते.

Story img Loader