दाभोलकर हत्येप्रकरणाचा तपास करताना पोलीस सर्व शक्यतांचा विचार करीत असून, हा तपास खूप गुंतागुतींचा असल्याचे मान्य करीत पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी पोलीसांवर कोणताही राजकीय दबाव नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सतीश माथूर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘लोकसत्ता’ यांनी आयोजित केलेल्या ‘आयडिया एक्सचेंज’मध्ये यासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरे देत होते.
ते म्हणाले, दाभोलकर हत्या हा राज्यातील खूप गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्याचा तपास करताना पोलीस वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करताहेत. हत्येमागे काही वेगळे कंगोरे आहेत का, याचीही चाचपणी करण्यात येते आहे. मात्र, आमच्यावर कोणत्याही स्वरुपाचा राजकीय दबाव नाही. लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याच्या निमित्ताने पोलीस चुकीचा तपास अजिबात करणार नाहीत. प्रत्येक शहरामध्ये उलगडा न झालेले असंख्य गुन्हे असतात. काही गुन्ह्यांचा उलगडा होण्यास उशीर होते. दाभोलकर हत्येप्रकरणी आम्ही सर्व बाजूंचा तपास करत आहोत आणि आमचा आमच्यावर विश्वास आहे.
दाभोलकर हत्येप्रकरणी पोलीसांवर कोणताही राजकीय दबाव नाही – आयुक्त
दाभोलकर हत्येप्रकरणाचा तपास करताना पोलीस सर्व शक्यतांचा विचार करीत असून, हा तपास खूप गुंतागुतींचा असल्याचे मान्य करीत पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी पोलीसांवर कोणताही राजकीय दबाव नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले.
First published on: 07-05-2014 at 05:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dabholkar murder case no political pressure on pune police says satish mathur