दाभोलकर हत्येप्रकरणाचा तपास करताना पोलीस सर्व शक्यतांचा विचार करीत असून, हा तपास खूप गुंतागुतींचा असल्याचे मान्य करीत पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी पोलीसांवर कोणताही राजकीय दबाव नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सतीश माथूर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘लोकसत्ता’ यांनी आयोजित केलेल्या ‘आयडिया एक्सचेंज’मध्ये यासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरे देत होते.
ते म्हणाले, दाभोलकर हत्या हा राज्यातील खूप गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. त्याचा तपास करताना पोलीस वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करताहेत. हत्येमागे काही वेगळे कंगोरे आहेत का, याचीही चाचपणी करण्यात येते आहे. मात्र, आमच्यावर कोणत्याही स्वरुपाचा राजकीय दबाव नाही. लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याच्या निमित्ताने पोलीस चुकीचा तपास अजिबात करणार नाहीत. प्रत्येक शहरामध्ये उलगडा न झालेले असंख्य गुन्हे असतात. काही गुन्ह्यांचा उलगडा होण्यास उशीर होते. दाभोलकर हत्येप्रकरणी आम्ही सर्व बाजूंचा तपास करत आहोत आणि आमचा आमच्यावर विश्वास आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा