अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन आठवडे पूर्ण होत आले तरी पुणे पोलिसांना अजून हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी सोमवारी दुसऱया हल्लेखोराचे रेखाचित्र जारी केले. टोपी घातलेल्या हल्लेखोराचे रेखाचित्र जारी करण्यात आले.
दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट रोजी सकाळी डॉ. दाभोलकर यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. दाभोलकरांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेनंतर दोन हल्लेखोरांपैकी एकाचे रेखाचित्र प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे दुसऱयाचे रेखाचित्र जारी करण्यात आले. हल्ल्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. मात्र, अजून पोलिसांना कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत.

Story img Loader